Palghar: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:24 IST2025-05-17T17:23:02+5:302025-05-17T17:24:39+5:30

Palghar Police Assault Case: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी दोन महिलांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Palghar: 9 People Booked For Assaulting On-Duty Police Constable Addressing Traffic Hazard In Naigaon | Palghar: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

Palghar: पालघरमध्ये ऑन ड्युटी पोलिसावर हल्ला, ९ जणांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

पालघर येथील नायगाव पूर्व परिसरात आज मध्यरात्री ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना प्रिन्स ढाबाजवळ मध्यरात्री १२.४० वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी धोकादायक ठिकाणी डंबर पार्क केला. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने डंबर घटनास्थळावरून हलवण्यात सांगितला. मात्र, त्यामुळे वाद पेटला आणि आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल यांना मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ विक्रम बोडखे यांनी रस्त्यात धोकादायक ठिकाणी पार्क केलेल्या डंपरच्या चालकांना त्यांचे वाहन तिथून हलवण्याची विनंती केली. मात्र, त्यामुळे संतापलेला डंपर चालक सुनील रघुनाथ राठोड आणि त्याच्या साथीदारांनी कॉन्स्टेबल बोडखे यांना मारहाण केली. याप्रकरणी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, सविता राठोड, रुतिक राठोड, अनिल राठोड, प्रवीण राठोड, कुशल चव्हाण, पूजा कुशल चव्हाण आणि रेखा अप्पाराव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. इतर दोन जणांची अद्याप ओळक पटलेली नाही. आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याला धमकावण्याचा आणि हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आरोपींवर पोलीस कर्मचाऱ्याला त्यांच्या अधिकृत कर्तव्यात अडथळा आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवल्याचा आरोप आहे.

अद्याप कोणालाही अटक नाही
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गुन्हेगारी धमकी, बेकायदेशीर जमणे आणि कर्तव्यात अडथळा निर्माण करणे, अशा गुन्ह्यांचा यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलिस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक रोशन देवरे तपास करत आहेत.

Web Title: Palghar: 9 People Booked For Assaulting On-Duty Police Constable Addressing Traffic Hazard In Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर