पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत. ...
महानगरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या आता एवढी वाढलीय की, मुख्य बाजारपेठेच्या क्षेत्रात वाहन पार्किं ग करणे म्हणजे जणू दिव्यच ठरावे. नाईलाजाने वर्दळीच्या रस्त्यावर कडेलाच वाहन पार्किंग करून नागरिकांना कामे उरकावी लागतात. अशातच अनेकदा वाहतूक विभागाकडू ...
तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी त ...
तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व ...
चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्प ...
दोन अल्पवयीन मुलींवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी तिवसा तालुक्यात घडली. तो मुलगा पसार झाला आहे. ...
येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीकरिता अचलपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. प्रहार तटस्थपणे ‘अपना भिडू’वर थांबली आहे, तर लोकसभेनंतर रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या आग्रही भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित बिघडणार आहे. काँग्रेसकडून ...
पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्य ...
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता ...