नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० शाखा नागपूरतर्फे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत ...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...
दोन नाल्यांचा संगमातून उगम पावलेल्या धाबा ते किरमिरी नाल्यावरील पुलाचे बांधकाम भर पावसात सुरू असताना पुरामुळे भुईसपाट झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस ...
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांनी अद्याप नावाची नोंदणी केली. त्यांनी ग्रामसेवक व तलाठ्यांकड ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...
कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली. ...
घराच्या छपरात झोपून असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पांढरवाणी झोळेटोली येथे घडली. मंदा रामदास कुंभरे (५१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आह ...
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर ...
जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली. ...