अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत. ...
सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे. ...
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. ...
भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...
वेगात जाणाऱ्या रेल्वेगाडीने रुळावर काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिली. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगनेर शिवारात हावडा - मुंबई रेल्वेमार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ...
: स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे. ...
वर्धमाननगरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...