नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:56 PM2019-09-05T23:56:55+5:302019-09-05T23:57:50+5:30

वर्धमाननगरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Arresting brokers who blacked train tickets | नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १४ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : वर्धमाननगरात रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सुरेश डुलगच यांनी वर्धमाननगरीत एका दुकानात ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती निरीक्षक रवि जेम्स यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सुरेश डुलगच, नवल डाबेराव, संदीप सोनवने, बी. एम. मदनकर, अमित बारापात्रे हे नंदनवन पोलिसांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. वर्धमाननगर भीम चौक येथील बालाजी इंटरप्रायजेस दुकानाच्या बाजूला असलेल्या दुकानावर त्यांनी धाड टाकली. तेथे काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीने आपले नाव सुमित राजकुमार गजभिये (२७) रा. प्लॉट नं. ११७, सुगत बौद्ध विहाराजवळ, गरोबा मैदान असे सांगितले. गरजू ग्राहकांकडून १०० ते २०० रुपये अधिक घेऊन ई-तिकीट पुरवित असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्याच्या जवळील लॅपटॉपची तपासणी केली असता ८ ई-तिकीट किंमत १८९४४ तसेच आधी काढलेले ६ ई-तिकीट किंमत १४५४१ जप्त करण्यात आले. याशिवाय लॅपटॉप १५ हजार, डोंगल, मोबाईल असा एकुण ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने पाच फेक आयडीच्या साहाय्याने ई-तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिली. त्याच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Arresting brokers who blacked train tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.