अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:22 AM2019-09-06T01:22:23+5:302019-09-06T01:22:46+5:30

सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.

Area of mama ponds reduced by encroachment | अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

अतिक्रमणाने घटले मामा तलावांचे क्षेत्र

Next
ठळक मुद्देमोजणीच नाही : लिलावाची रक्कम संस्थेच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या मामा तलावांचा उपयोग मत्स्यपालनासाठी केला जात आहे. परंतु गत काही वर्षांपासून मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तलावाचे क्षेत्र घटले आहे. मात्र लिलाव करताना शासकीय दप्तरी असलेले क्षेत्रच ग्राह्य धरल्या जाते. परिणामी लिलाव घेणाऱ्या संस्था यामुळे आर्थिक अडचणीत येऊन लिलावाची रक्कम त्यांच्या मानगुटीवर बसत असल्याचे दिसत आहे.
सिहोरा परिसरात जिल्हा परिषदेअंतर्गत मामा तलाव आहेत. या तलावांची लिलाव प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. तलाव लिलाव प्रक्रियेचा कालावधी १ जुलै ते ३० जून २०२४ असा आहे. प्रत्यक्षात तलाव लिलाव प्रक्रिया ३० जूनच्या आधी करण्याची गरज होती. या कालावधीत मत्स्य बिज उपलब्ध होत असल्याने मत्स्यपालन संस्थांनी दोन महिन्यांपासून ओरड सुरु केली. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा पहिला फटका मत्स्यपालन संस्थांना बसत आहे. उशिरा लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली असतानाही अनेक संस्थांनी लिलावात भाग घेतला. कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.
दरम्यान सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे.
यात नोंद असणाºया हेक्टर आर क्षेत्रानुसार तलावाची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या क्षेत्रफळानुसार मत्स्यपालन संस्था, लिलावाची राशी जिल्हा परिषदेला अदा करीत आहेत.
परंतु प्रत्यक्षात निर्धारित क्षेत्रफळानुसार तलाव अस्तित्वातच नाहीत. तलावाचे अधिकार क्षेत्रात असणारी हेक्टर आर जागा अतिक्रमणात गेली आहे. प्रत्यक्ष नोंद असणाºया तलावाचे क्षेत्रफळ उपलब्ध नाही. ते आता परिणाम मत्स्यबिजांवर होणार आहे. ऐवढेच नाही तर कमी क्षेत्रफळासाठी जास्त रक्कम भरण्याचा फटकाही मत्स्यपालन संस्थांना सहन करावा लागत आहे.

तलावांचा श्वास मोकळा कधी होणार?
सिहोराच नव्हे तर जिल्ह्यातील मामा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. या तलावांचे अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत कुणीही पुढाकार घेतला नाही. तलावांचे क्षेत्रफळ गेल्या कित्येक वर्षापासून मोजले नाही. या तलावांचा श्वास कधी मोकळा होणार असा प्रश्न मत्स्य पालन संस्था करीत आहेत.
मत्स्य आयुक्तांनी मागितली माहिती
जून महिन्यात पाण्याअभावी तलाव आणि नदीपात्रातील मासे आणि बोटकुलीचा मृत्यू झाला. वैनगंगा नदीवरील धापेवाडा धरणाच्या पाण्यात मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मत्स्य आयुक्तांनी मागविली आहे. त्यामुळे आता तलावांची माहिती गोळा केली जाणार आहे. या महिन्यात मत्स्यपालन संस्थांना आर्थिक फटका बसला आहे. या माहितीमुळे संस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लिलावात काढण्यात आलेले तलावांचे क्षेत्रफळ प्रत्यक्षात नाही बहुतांश तलाव अतिक्रमणामुळे क्षेत्रफळात कमी आहे. त्यामुळे तलावांची मोजणी होणे गरजेचे आहे.
-राजकुमार मोहनकर, मत्स्यपालन संस्था, मच्छेरा.

Web Title: Area of mama ponds reduced by encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.