आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:06 AM2019-09-06T00:06:37+5:302019-09-06T00:07:45+5:30

विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.

Now night flight of Nagpur-Mumbai plane | आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

googlenewsNext
ठळक मुद्देमदिनाहून येताहेत एअर इंडियाची विमाने : कंपनीची मध्यरात्रीनंतर दिल्ली विमानसेवा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मक्का येथे यात्रेसाठी गेलेले भाविक आता मदिनाहून नागपुरात एअर इंडियाच्या विमानाने परत येत आहेत. ही विमाने सकाळी, दुपारी आणि रात्री येणार आहेत. विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे.
मदिना येथून एकूण १२ विमानातून यात्रेकरू नागपुरात येणार आहेत. पहिले विमान १ सप्टेंबरला आले. दुसरे विमान गुरुवारी मध्यरात्रीनंतर रात्री २ वाजता येणार आहे. हेच विमान मुंबईला रिक्त जाण्याऐवजी एअर इंडियाने कमी फेअरची योजना आणली आहे. या विमानाचे भाडे १९०० ते २ हजारांदरम्यान आहे. एरवी नागपूर ते मुंबईचे भाडे ३५०० ते ५ हजार रुपयांदरम्यान असते. त्यामुळे रात्री प्रवास करताना प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.
एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, एअर इंडियाची एकूण १२ विमाने मदिना येथून नागपुरात येणार आहेत. त्यापैकी ९ विमाने मुंबईला परत जातील. ही विमाने रिक्त जाण्याऐवजी कंपनीने कमी फेअर शुल्काची योजना आणली आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होत आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुंबईला जाणाऱ्या १६० सिटचे एअर बस विमान फुल्ल आहे. याशिवाय वेळापत्रकानुसार प्रवाशांनी पूर्वीच बुकिंग केले आहे.
याशिवाय एअर इंडिया २८ सप्टेंबरपासून नागपूर-दिल्ली आणि दिल्ली-नागपूर नवीन विमानसेवा रात्री सुरू करणार आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानाचे भाडे कमी राहणार आहे. हे विमान रात्री २ वाजता उड्डाण करून पहाटे ३.४० वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. तत्पूर्वी दिल्लीहून रात्री ११.३० वाजता निघून नागपुरात १.३५ वाजता पोहोचणार आहे.
घरगुती प्रवासात एअर इंडिया पहिल्यांदाच मध्यरात्रीनंतर विमान सेवा सुरू करणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय मार्गावरच रात्री धावपट्टीचा उपयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास अन्य कंपन्याही विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना अन्य शहरात जाण्यासाठी कनेक्टिंग विमाने मिळतील.

Web Title: Now night flight of Nagpur-Mumbai plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.