छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत. ...
बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत आहेत. ...
वहिनी नेहमीच टोचून बोलते, तिला आपण आवडत नाही, याचा राग मनात धरून एका विद्यार्थिनीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. होशंगाबादवरून तिने विनातिकीट नागपूर असा प्रवास केला. ...
गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे. ...
जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. ...
रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. ...
दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. ...
३१ मे २०१८ पर्यंत शहरातील सर्व मार्गावर एलईडी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर व नंतर ३० सप्टेंबर २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदत वाढवून दिल्यानंतरही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत. ...