नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 09:05 PM2019-10-31T21:05:25+5:302019-10-31T21:05:52+5:30

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत.

Onion is expensive in Nagpur! Crop damaged by rain | नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब

नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब

googlenewsNext
ठळक मुद्देआवक कमी, आणखी भाव खाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे महिलांसाठी स्वयंपाकघरात कांद्याची फोडणी महाग झाली आहे.
कनार्टक, आंध्रप्रदेशात पीक खराब
कळमना आलू-कांदे बाजारात तीन दिवसांपूर्वी ८०० ते १००० रुपये मण (४० किलो) असलेले कांद्याचे भाव आवक कमी झाल्यामुळे अचानक १२०० ते १६०० रुपयांवर अर्थात ठोक बाजारातच कांदे दर्जानुसार प्रति किलो ३० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात निघणाच्या तयारीत असलेला २५ टक्के कांदे पावसामुळे खराब झाले. तर दसऱ्याला बाजारात येणारा धुळे येथील कांदा आता विक्रीस येत आहे. नाशिक येथील दिवाळीत निघणाºया कांद्यासाठी पुन्हा १५ ते २० दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी झाल्यामुळे भाव अचानक वाढले. काही दिवसांपूर्वी आठवड्यात २० ते २५ ट्रकची आवक आता १० ते १२ ट्रकपर्यंत कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.
आवक ५० टक्क्यांनी घसरली
शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आता २० टक्के शिल्लक आहे.तर सरकारने वेअरहाऊसमध्ये ठेवलेला कांदा मध्यंतरी भाववाढीनंतर बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे आता सरकारकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे भाववाढीवर पर्याय म्हणून सरकारकडून कांदा बाजारात येणार नाही. आवकीची क्षमता ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. हीच स्थिती संपूर्ण देशात आहे. धुळे आणि नाशिकचा कांदा पूर्णक्षमतेने बाजारात येईपर्यंत ग्राहकांना महिनाभर जास्त भावातच कांदे खरेदी करावे लागतील, असे वसानी यांनी सांगितले.
तर कांदा पोहोचला असता १०० रुपयांवर!
निर्यातबंदी आणि अफगाणिस्तान व इजिप्तमधून कांद्याची आयात सुरू असल्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आहे. निर्यात सुरू असती तर कांद्याचे भाव १०० रुपयांवर पोहोचले असते आणि सरकारची स्थिती बिकट झाली असती. अफगाणिस्तान आणि इजिप्तचा कांदा पंजाब आणि दिल्लीला येत आहे. त्यामुळे या राज्याची गरज पूर्ण होत आहे. या कांद्याची गुणवत्ता चांगली नाही, पण शॉर्टेजमुळे विक्री होत आहे.

हुगळी, कर्नुल, बेळगाव येथून आवक
सध्या लाल कांदे हुगळी आणि कर्नुल तर पांढरे कांदे बेळगाव येथून येत आहेत. विदर्भातून कांद्याची आवक संपली आहे. अन्य जिल्हे वा राज्यातून आवक कमी असतानाही विदर्भातील बुलडाणा येथून लाल आणि अमरावती व अकोला येथून येणाºया पांढºया कांद्यामुळे कळमना बाजाराची गरज पूर्ण होते. पण सध्या या भागात लागवड सुरू असून मार्चमध्ये पीक निघेल, असे वसानी यांनी स्पष्ट केले.

बटाटे महागले
कळमना बाजारात मागील आठवड्यापर्यंत प्रति किलो ८ ते १० रुपयांवर असलेले बटाट्याचे भाव आता १२ ते १५ रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये भाव २५ ते ३० रुपयात विक्री होत आहे. भाववाढीसाठी पाऊस महत्त्वाचा घटक ठरला आहे. बेंगळुरू येथे पावसामुळे बटाट्याचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. त्यामुळे जुन्या मालाची आवक वाढली, पण त्यासोबतच भावही वाढले आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा, तिरसागंज, कानपूर येथून आवक आहे. नियमित होणारी २५ ट्रकची आवक आता १५ ते २० ट्रकपर्यंत कमी झाली आहे. पुढे बटाट्याच्या भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.

लसूण, अद्रक महागले
गेल्यावर्षी पीक कमी झाल्यामुळे आणि यंदा पावसामुळे पीक खराब झाल्यामुळे लसणाची आवक कमी झाली आहे. परिणामी भाव वाढले आहेत. राजस्थानातील कोटा, मध्य प्रदेशातील रतलाम आणि उज्जैन येथून नियमित होणारी तीन ट्रकची आवक आता दोनपर्यंत कमी झाली आहे. कळमन्यात चांगल्या प्रतिचे लसूण १८० ते २०० रुपये किलो विकल्या जात आहे. त्यासोबतच किरकोळमध्ये भाव वाढले आहेत. नवीन लसूण बाजारात येण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
अद्रकाचे भाव ठोकमध्ये ४० ते ५० रुपयांवर असून, किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बाजारात जुना आणि नवीन माल विक्रीस आहे. कळमन्यात अद्रकची आवक केरळ राज्यातून होते. नवीन माल छिंदवाडा येथून येत आहे. सध्या तीन ते चार ट्रकची आवक आहे.

Web Title: Onion is expensive in Nagpur! Crop damaged by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.