१९७२ च्या वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याला मारणे किंवा त्याच्याशी खेळणे हा गुन्हा असून सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांवर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. ...
पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे. ...
अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते. ...
मानकापूर चौकातील अॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जेनेटिक क्लिनिकची नोंदणी रद्द करून तेथील आठ वैद्यकीय यंत्रे जप्त करण्याच्या कारवाईमध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी पक्षपाती भूमिका बजावली. ...
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. ...
सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...
मागील दीड वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पावणेसात लाखाहून अधिक नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. ...