सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:53 PM2020-07-24T23:53:09+5:302020-07-24T23:56:21+5:30

सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Want to kill healthy citizens? | सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का?

सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का?

Next
ठळक मुद्दे व्हिडिओ व्हायरल : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या संक्रमितांचा सवालपायाभूत सुविधाही नसल्याने रुग्ण त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या व्हिडिओत रेखा अंधे नामक महिलेने महिला व पुरुषांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याचा दावा केला आहे. वॉशरूम स्वच्छ नाही. चांगली प्रकृती असलेल्यांची तब्येत खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का, अशा वातावरणात दहा दिवस कसे काढणार, जेवणाचा दर्जा इतका खराब आहे की त्यामुळे प्रकृती खराब होत आहे. उत्तम आरोग्य असलेल्या नागरिकांना आजारी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यात केला गेला आहे.
याच व्हिडिओमध्ये एका दुसऱ्या संक्रमित महिलेनेही आपली व्यथा सांगितली आहे. येथे १४ दिवसांपासून क्वारंटाईन आहोत. प्रकृती सामान्य असतानाही आणखी दहा दिवस येथे ठेवून काय साध्य होणार असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. शुभम नावाच्या संक्रमितानेही तो येथे वॉर्ड नंबर ११ मध्ये भरती असल्याचे सांगितले आहे. तो मुंबई मेडिकलमधून असल्याचे व्हिडिओत सांगतो. यांच्यासोबत अन्य संक्रमित महिला व पुरुषही आहेत. हे सर्व लोक हॉस्पिटलशी निगडित असल्याचे शुभम सांगतो. आमच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. तरीदेखील आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला भरती करण्यात आले आहे. मात्र, दोन दिवसांपासून कोणतीही सुविधा दिली जात नाही. ना चांगले जेवण ना चहा-नाश्त्याची व्यवस्था ना आम्हाला कुणी बघायला येत. यापेक्षा व्हीएनआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना सर्व सुरळीत होते. जेवणाचा दर्जा अत्यंत निम्न आहे. त्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही. यापेक्षा उपाशी राहणे योग्य असून जेवण फेकण्यास मजबूर आहोत. बाथरूमची स्थिती अत्यंत घाण आहे. पाण्याची व्यवस्था नाही. इथे पाण्याचे दोन ड्रम आहेत. एकाचा उपयोग तोंड धुण्यासाठी तर दुसऱ्याचा बाथरूमकरिता करण्यास सांगितले गेले आहे. अशाने तर आम्ही आजारी पडू, अशी भीती शुभमने व्यक्त केली आहे.
येथेच उपचार घेत असलेल्या मंगेशने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयात कॉल केला होता. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाचे नंबर देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने कंट्रोल रूमचा नंबर दिला. तेथून दुसरीकडचा नंबर मिळाला. अखेर कंटाळून मेडिकलच्याच डॉ. अर्चना वानखेडे यांच्याशी बोलणे झाले तर अशा दुरवस्थेस साफ नकार दिला आणि स्वत: येऊन चेक करण्याचे आश्वासन दिले. अशा तºहेने रुग्णांकडे कोणाचेच लक्ष नसून, त्यामुळे रुग्ण त्रस्त झाल्याचे मंगेशने व्हिडिओत सांगितले आहे.

Web Title: Want to kill healthy citizens?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.