शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुते यांची राष्ट्रवादीला अखेर सोडचिठ्ठी काका-पुतण्यांवर टीका

By admin | Updated: August 16, 2014 03:05 IST

माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली. श्रीगोंदा येथे शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. आगामी विधानसभा अपक्ष अथवा भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी मेळाव्यात निर्धार केला. आ. पाचपुते म्हणाले, २००४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर युतीच्या नेत्यांनी चार आमदार घेऊन या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी आॅफर दिली होती. परंतु शरद पवारांना आपण पाठिंबा दिला. मला वनमंत्री, आदिवासी मंत्री केले, परंतु मनासारखे खाते दिले नाही. गृहराज्यमंत्री केले आणि दीड वर्षात घरी पाठविले. जे नेते काहीच करीत नाहीत, त्यांना १५-१५ वर्षे मंत्री ठेवले. मी काका-पुतण्यांना कुकडीचे पाणी, रस्त्यासंदर्भात अडचणी सांगितल्या. त्यांना १५ दिवसांपूर्वी भेटलो. माझी त्यांनी अवहेलना केली. मी पक्ष सोडणार अशी चर्चा त्यांच्या कानावर गेली, परंतु त्यांनी मला साधा फोनसुद्धा केला नाही, याचे मला दु:ख झाले. मी लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांचे जबाबदारीने काम केले. वास्तव परिस्थिती समजून न घेता पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या सांगण्यावरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. (तालुका प्रतिनिधी)