शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Oxygen Shortage: केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 4:29 PM

Oxygen Shortage: केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचे ऑक्सिजन पुरवठ्यावरून ट्विटमहाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा केल्याचा दावाअन्य राज्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक ऑक्सिजन

मुंबई: संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे. परिणामी कोरोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघण्यासाठी केंद्राला साकडे घातले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis claims maharashtra got allotment of 1784 mt oxygen supply)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच या ट्विटसह तपशील मांडणारे दोन फोटोही शेअर केले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी 

महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील. बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

केंद्रातील मोदी सरकारकडून महत्वाचा निर्णय

दुसरीकडे, देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

दरम्यान, शनिवारी राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली असून, दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २,७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी