शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील कलाकारांचा भरघोस प्रतिसाद

By admin | Updated: March 17, 2017 03:25 IST

महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असलेल्या ‘लोकमत’तर्फे आयोजित चौथ्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाइन प्रवेशिका

मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असलेल्या ‘लोकमत’तर्फे आयोजित चौथ्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आॅनलाइन प्रवेशिका भरण्याची शुक्रवार १७ मार्च ही अंतिम मुदत आहे. वैयक्तिक माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून स्पर्धकांना आपल्या प्रवेशिका सायंकाळपर्यत अपलोड करता येतील. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रभरातून दोन हजारांवर कलाकारांनी वेबसाइटवर नोंदणी करून प्रवेशिका पाठविल्या आहेत. कैलाश खेर विशेष आकर्षणनागपुरात २५ मार्च रोजी आयोजित एका विशेष कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लक्ष रुपये सन्मान निधी, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ख्यातनाम गायक कैलाश खेर यांची उपस्थिती. ते तब्बल दोन तास गीतांचा कार्यक्रम सादर करतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यावेळी काही गाणी सादर करतील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सपट परिवारा’च्या वतीने ‘सपट बँड’च्या सादरीकरणाचा रसिकांना आस्वाद घेता येईल. या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानासोबतच या क्षेत्रातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ प्रदान करीत असतो. यंदा या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. (प्रतिनिधी)आॅनलाइन प्रवेशिका पाठविण्याची पद्धतजास्तीत जास्त पाच मिनिटे कालावधीची आपली प्रवेशिका आॅडिओ अथवा व्हिडिओ या कोणत्याही एका माध्यमात तयार करा. प्रवेशिका आॅनलाइन अपलोड करण्यासाठीwww.surjyotsna.org  या संकेतस्थळास भेट द्या. ‘सूर ज्योत्स्ना’ पुरस्कारासंबंधीची सर्व माहिती व्यवस्थित वाचा. प्रवेशिका अपलोड करण्यासाठी ‘सबमिट’वर क्लिक करा. वैयक्तिक माहितीसह झोन निवडून ‘क्लासिकल’ अथवा ‘पॉप्युलर’पैकी एक प्रकार निश्चित करून आपली प्रवेशिका अपलोड करा. नियम व अटी चौकटीत क्लिक करा आणि सबमिट बटण दाबा. प्रवेशिका अपलोड करण्याची अंतिम मुदत १७ मार्च २०१७ अशी आहे. असे आहे स्पर्धेचे स्वरूप१ - ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.२ - अंतिम फेरीतील स्पर्धकांना नागपुरात २५ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळयात ‘लाइव्ह परफॉरमन्स’ची संधी दिली जाईल.