मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 07:33 IST2023-03-03T07:33:28+5:302023-03-03T07:33:51+5:30

 राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी...

Orders passed to jail me and the son; Bhaskar Jadhav's sensational allegations against Eknath Shinde in Vidhan sabha | मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मला आणि माझ्या मुलाला एक महिन्याच्या आत जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

 राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बोलवले आणि सांगितले, की भास्कर जाधवांना एका महिन्याच्या आत जेलमध्ये टाका. त्यात माझ्या मुलाचेही नाव घेण्यात आले. तुम्ही सत्ता घेतली, पक्ष घेतला, धनुष्यबाण घेतले; पण तुम्ही आम्हाला जिंकू शकणार नाही. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, तिथे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, असे जाधव यांनी यावेळी खडसावले. 

Web Title: Orders passed to jail me and the son; Bhaskar Jadhav's sensational allegations against Eknath Shinde in Vidhan sabha