शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाजू नये म्हणून विठ्ठलास रजई, मफलर तर रुक्मिणीमातेस शाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:38 IST

पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; वसंत पंचमीपर्यंत देवाच्या पोषाखात बदल

ठळक मुद्देदेवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते रुक्मिणीमातेला उबदार शाल पांघरली जाते, जेणेकरून थंडी वाजू नये अशी भावना आहे देवाला पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले जातात. पुढे उन्हाळ्यात देवाला पांढरे वस्त्र परिधान केले जाते

पंढरपूर :  हिवाळा सुरू झाला आहे़ थंडीमुळे सावळा विठुराया आणि रुक्मिणीमातेला थंडी वाजू नये म्हणून रजई, शाल आणि मफलर असा पोषाख सुरू करण्यात आला आहे. कार्तिकी वारी झाल्यावर प्रक्षाळपूजेच्या दुसºया दिवसापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला हा पोषाख केला जातो. हा पोषाख वसंत पंचमी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत ठेवला जातो, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

राज्यात यंदा पावसाने मुक्काम वाढवला. त्यामुळे थंडीही उशिराने पडण्यास सुरूवात झाली आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा जोपासणाºया वारकरी संप्रदायाचे आद्यस्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या पोषाखात बदल केला आहे. 

देवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते तर रुक्मिणीमातेला उबदार शाल पांघरली जाते. जेणेकरून थंडी वाजू नये अशी भावना आहे. याबरोबर देवाला पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले जातात. पुढे उन्हाळ्यात देवाला पांढरे वस्त्र परिधान केले जाते. असे असले तरी सध्या रजई, मफलर आणि शाल केलेल्या पोषाखात सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर