राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ करून घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:03 AM2019-12-02T11:03:17+5:302019-12-02T11:04:16+5:30

दहा विभाग : एक हजार ७७८ महाविद्यालयांना तत्काळ मूल्यांकन करावे लागणार

Order to 'NACC for all colleges in maharashtra | राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ करून घेण्याचे आदेश

राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ करून घेण्याचे आदेश

Next
ठळक मुद्देराज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद

पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षात नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट्रिडीटेशन कौन्सिलकडून (नॅक)  मूल्यांकन करून घ्यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय यांनी दिले आहेत. मात्र, राज्यातील राज्यातील दहा विभागांतील ३ हजार ४२ महाविद्यालयांपैकी केवळ १ हजार २६४ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहे. त्यामुळे उर्वरित १ हजार ७७८ महाविद्यालयांना तत्काळ नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया करावी लागणार आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील शनिवारी पार पडली. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनाबाबत चर्चा केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षात सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घ्यावे, अशा सूचना दिल्या. उच्च शिक्षणाच्या दर्जात वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन बंधनकारक केले आहे. परंतु, शासकीय महाविद्यालयांसह अनेक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.
नॅक मूल्यांकन केलेल्या राज्यातील शासकीय व अनुदानित महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. राज्यात एकूण २८ शासकीय महाविद्यालये आहेत. त्यातील २३ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. मात्र, मुंबई विभागातील ३, नागपूर व औरंगाबाद विभागातील प्रत्येकी १ अशा पाच शासकीय महाविद्यालयांचे अद्याप नॅक मूल्यांकन झालेले नाही. तसेच राज्यातील १ हजार ८३७ विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी केवळ १८१ विनाअनुदानित महाविद्यालयांनी मुल्यांकन करून घेतले आहे. त्यात अमरावती, औरंगाबाद, नांदेड आणि सोलापूर या विभागांतील बोटावर मोजता येतील एवढ्या महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे.
,...............
अनुदानित नॅक मूल्यांकन महाविद्यालयांची विभागनिहाय आकडेवारी 
पुणे विभाग आघाडीवर 
पुणे विभागात एकूण १६८ अनुदानित महाविद्यालये असून, त्यातील १६५ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. तर ३०८ विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी ४९ महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले आहे.विभागात एकूण ४७६ महाविद्यालये असून त्यातील २१४ महाविद्यालयांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
............
अमरावती विभागातील १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांनी, औरंगाबाद विभागातील ११५ पैकी १०२, जळगाव विभागातील ८३ पैकी ८२, कोल्हापुरातील १३३ पैकी १३२, मुंबई विभागातील १०० पैकी ९२, नागपूर विभागातील १९५ पैकी १५४, नांदेड विभागातील ९७ पैकी ९३, पनवेल विभागातील ९४ पैकी ९२, पुणे विभागातील १६८ पैकी १६५ मूल्यांकन केले आहे. सोलापूर विभागातील ४० पैकी सर्व ४० महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे.
.......
विभागाचे                 महाविद्यालयांची        नॅक झालेल्या 
नाव                              संख्या                   महाविद्यालयांची संख्या 
अमरावती                     २९१                           १२६
औरंगाबाद                    ३८७                           १११
जळगाव                       १५१                            ९४
कोल्हापूर                     २२४                           १५४
मुंबई                            २४२                            १२८
नागपूर                        ५७०                           १६९
नांदेड                          २६१                             ९१
पनवेल                        ३६३                           १३०
पुणे                            ४७६                           २१४
सोलापूर                    ७७                              ४७
                                ३,०४२                         १,२६४


 

Web Title: Order to 'NACC for all colleges in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.