Rain In Maharashtra: मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 06:12 IST2022-08-07T06:12:20+5:302022-08-07T06:12:28+5:30
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत.

Rain In Maharashtra: मध्य महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात
मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याचाही यात समावेश आहे. राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१४ गावे प्रभावित झाली आहेत. ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११६ नागरिकांना जीव गमावला आहे, तर २३१ प्राणी दगावले आहेत. आतापर्यंत पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी शनिवारी अधूनमधून पावसाच्या सरींची नोंद झाली. पश्चिम आणि पूर्व उपनरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, शहरात पावसाने उसंत घेतली. शहराच्या काही भागांत चक्क कडक ऊन पडल्याने घामाच्या धारा वाहात होत्या.