शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी चालवले सभागृहाबाहेर अधिवेशन; विनापरवाना आणलेले माईक, स्पीकर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 08:33 IST

पायऱ्यांसमोर चालू असलेले विरोधकांचे अधिवेशन बंद पाडल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा माध्यमांसाठी केलेल्या जागेकडे वळवला. दिवसभर तेथेच विरोधकांनी ठाण मांडले.

मुंबई : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या कारणावरून विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्या ऐवजी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच अभिरुप अधिवेशन भरवले. मात्र अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी माईक, स्पीकर आणले गेले. खुर्ची, टेबल टाकण्यात आले. हे लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी सगळे साहित्य जप्त करायला लावले.पायऱ्यांसमोर चालू असलेले विरोधकांचे अधिवेशन बंद पाडल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा माध्यमांसाठी केलेल्या जागेकडे वळवला. दिवसभर तेथेच विरोधकांनी ठाण मांडले. तेथे बसून सगळ्यांनी भाषणे केली. सकाळपासूनच विरोधकांनी पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी सुरू केली होती. अधिवेशन ११ वाजता सुरू झाले तेव्हा विरोधक सभागृहात आले नाहीत. मात्र सभागृहाबाहेर अधिवेशन भरवायचे या तयारीने आलेल्या विरोधकांनी विधान भवनाच्या दारावर अभिरुप विधानसभा, असे बॅनर लावले. माईक आणि स्पीकर आणले गेले. खुर्च्या टाकल्या गेल्या, टेबलही लावले आणि पायऱ्या व मोकळ्या जागेत हे अधिवेशन सुरू झाले.सभागृहात यावरून अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. बाहेर माईक, स्पीकर लावण्याची परवानगी घेतली होती का? अध्यक्षांना त्याबद्दल माहिती दिली होती का?, असे प्रश्न भास्कर जाधव यांनी केले. त्यावर आपली यासाठी परवानगी घेतली नव्हती, असे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. त्यानंतर मात्र तालिका अध्यक्ष म्हणून स्वत: भास्कर जाधव यांना उपाध्यक्षांनी बोलावले. त्यामुळे स्वत:च केलेल्या मागणीवर स्वत:च आदेश देण्याची वेळ जाधव यांच्यावर आली. त्यांंनी मार्शलना सांगून सगळे साहित्य तातडीने जप्त करण्याचे आदेश दिले. तेव्हा चिडलेल्या भाजप आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली.

त्यांना परवानगी,  माईक दिला कोणी? विरोधकांनी विधानसभागृहाच्या बाहेर अभिरुप विधानसभा भरवलीच कशी, त्यांना कोणी परवानगी दिली, माईकची व्यवस्था कोणी केली असा हल्लाबोल करीत सत्तारुढ पक्षाचे मंत्री व सदस्यांनी हा माईक तत्काळ काढून घेण्याची मागणी केली. त्यावर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तसे आदेश दिले.

भास्कर जाधव यांनी विरोधकांनी भरविलेल्या अभिरुप विधानसभेकडे लक्ष वेधत ही विधानसभा चॅनेलवर लाइव्ह कशी दाखविली जात आहे, विरोधकांना माईक कोणी पुरविला, परवानगी कोणी दिली असा सवाल केला. हा माईक तत्काळ काढून घ्या, विरोधकांना तिथून हटवा, सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींनी केली. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस