शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:21 IST

Ashish Shelar News: महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.

मुंबईमहायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित ‘निवडणूक आणि महाराष्ट्राचे राजकारण’ या विषयावरील  वार्तालापात शेलार बोलत होते. ते म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.  ते एकत्रित निवडणूक लढणार असे गृहीत धरले तर महायुतीची भीती वाटल्याने त्यांना एकत्र यावे लागले, असा निष्कर्ष निघू शकतो. 

मनसेतर्फे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सोमवारी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित करत, भाजपला परप्रांतीय महापौर करायचा आहे, असा आरोप केला. त्यावर शेलार म्हणाले, “दुबार मतदार म्हणून मराठी, भूमिपुत्र, हिंदूच नावे कशी आणता? तुमचा प्रवास अहिंदू आहे. तुम्ही सुरुवातीला बिहारींविरुद्ध बोलला, मग उत्तर भारतीयांविरुद्ध, त्यानंतर हिंदी भाषिक, जैन, गुजरातींविरुद्ध बोलला, आणि आता भूमिपुत्र. त्यामुळे तुम्हीच तुष्टीकरण करत आहात. मनसे आणि उद्धवसेना दुबार मुस्लीम मतदारांची नावे देत नाही, कारण त्यांना मुंबईत अल्पसंख्याक मुस्लीम महापौर करायचा आहे का?”

‘त्यांचे ५० जागी नगरसेवक निवडून येणेही कठीण’आम्ही युतीत सडलो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्याने २०१७ ची महापालिका निवडणूक स्वतंत्र लढलो. ते बाहेर पडले आणि मुंबईकरांनी त्यांना फटका दिला. १००च्यावर जागा असलेला त्यांचा पक्ष २०१७ मध्ये ८४ वर आला आणि भाजप ३२ वर असलेला ८२ वर गेला.त्यामुळे त्यांचा आलेख हा उतरता आहे, हे लक्षात घेता त्यांचा आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सगळ्या पक्षांना मिळून या महापालिका निवडणुकीत मुंबईत ५०-५५ नगरसेवक निवडून आणणेही कठीण जाईल, असे शेलार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance's Tsunami Spooks Opposition: Ashish Shelar's Jibe at Thackeray.

Web Summary : Ashish Shelar taunted the opposition, saying they're scrambling to save their homes from the Mahayuti's 'tsunami.' He suggested Thackeray and Raj coming together shows their fear of the alliance and criticized MNS's stance on voters, accusing them of minority appeasement.
टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाMahayutiमहायुतीMumbaiमुंबई