शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:31 IST

ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा भाजपाला टोला, राणेंवर निशाणा!

ठळक मुद्देशैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी कृती समितीकोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर

पुणे : राजकारणामध्ये किती वर्ष आहे, यापेक्षा त्यामध्ये गुणवत्ता किती आहे हे पाहायला हवे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात काहीच वावगे नाही. मात्र ,विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी असल्याने ते टीका करत आहेत. तसेच काही लोक स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहेत. अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ’ पद्म ' पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात लवकर तज्ज्ञांती कृती समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. धोरणातील विविध तरतुदींची अंमलबजावणी व बदल करण्याबाबत पुढील एक-दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मिती निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असे सामंत यांनी नमुद केले.

महाविद्यालये बंद असून दुसऱ्या वर्षापर्यंतच्या परीक्षाही होणार नाहीत. त्यामुळे जिम, प्रयोगशाळा, ग्रंथालये बंद आहेत. देखभाल-दुरूस्तीचाही खर्च नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. तसेच प्रवेश शुल्कामध्येही या बाबींचा समावेश न करता केवळ शिक्षण शुल्क घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये. याबाबत बैठक घेणार असून आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.-------------औरंगाबादमध्ये औषधनिर्मिती विद्यापीठऔरंगाबादमध्ये औषधनिर्मितीशास्त्र संबंधी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २५ ते ३० एकर जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. केंद्र शासनाकडे प्रस्तावही गेला आहे. पण त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे या प्रस्तावासह केंद्र शासनाकडे गेलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.-------------

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपा