शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या कामगार, कृषी कायद्यातील दुरुस्तीला विरोधच, पण २६ तारखेच्या संपात सहभाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 17:01 IST

भारतीय मजदूर संघानेच केंद्र सरकारच्या कामगार कायदा व शेतकी कायद्यातील दुरूस्त्यांना देशात सर्वप्रथम जाहीरपणे विरोध केला होता.

ठळक मुद्दे भारतीय मजदूर संघाची भूमिका : संपकरी संघटनांवर टीका

पुणे: केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या दुरूस्त्यांना विरोध करणाऱ्या भारतीय मजदूर संघाने या दुरूस्त्यांना विरोध म्हणूनच देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी व्हायला मात्र नकार दिला आहे. आमचा विरोध कायमच आहे, मात्र आम्ही या संपात नाही असे भामसंचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र देशपांडे यांनी सांगितले. भामसंची ही देशातील सर्वाधिक कामगार सदस्य असलेली कामगार संघटना आहे.

भारतीय मजदूर संघानेच केंद्र सरकारच्या कामगार कायदा व शेतकी कायद्यातील दुरूस्त्यांना देशात सर्वप्रथम जाहीरपणे विरोध केला. केंद्र सरकारकडे आपली भूमिका स्पष्ट केली. तरीही दखल घेतली जात नाही म्हटल्यावर आंदोलनेही केली. त्यावर सरकारने संघटनेबरोबर चर्चा करणार असे सांगितले आहे. केंद्रीय स्तरावर या चर्चेची वेळ व पदाधिकारी निश्चित होतील. त्यानंतर आता देशातील कामगार संघटनांना जाग आली आहे. त्यांचे २६ नोव्हेंबरचे एक दिवसाचा लाक्षणिक संप व चक्का जाम हे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप देशपांडे यांनी केला. त्यामुळेच त्यात आम्ही सहभागी होणार नाही असे ते म्हणाले.कामगार व शेतकरी कायद्यातील दुरूस्ती हे विषय महत्वाचे असताना त्यात विद्यार्थी, साहित्यिक, सांस्कृतिक असे अनेक विषय विनाकारण घेण्यात आले आहेत. देशातील कामगार क्षेत्रासमोर सध्या अनेक समस्या आहेत. त्यावर सर्व कामगार संघटनांचे एकमत झाले पाहिजे  असेच भामसंचे म्हणणे आहे, मात्र तसे न करता अन्य विषयही त्यात घूसवून आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या २६ नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात भामसंचा एकही सदस्या सहभागी होणार नाही, सर्व संलग्न संघटना व त्यांचे सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहतील याची दक्षता भामसं घेणार आहे अशी माहिती देशपांडे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारStrikeसंप