शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नाणारच्या रिफायनरीला जनतेचा विरोधच - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:59 AM

नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

- विशेष प्रतिनिधी मुंबई - नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावासविरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्याने प्रकल्पासंबंधातील असहमती पत्रे मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली. नागरिकांशी बोलून शासन प्रकल्पाबाबत निर्णय घेईल. विरोध कायम असल्यास स्थानिक जनतेवर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. परिणामी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबत सामंजस्य करार होऊ शकला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकल्पाबाबत निर्णय जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे देसाई यांनी निवेदनात सांगितले. देसाई यांच्या निवेदनादरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन बोलू देण्याची मागणी करू लागले. मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ती अमान्य केली.स्वतंत्र चर्चाकरणार - मुख्यमंत्रीनाणारच्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकाही उद्योगमंत्रीच सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय आहे? इतर सदस्यांनाही या विषयावर बोलायचे आहे. तेव्हा या विषयावर एक स्वतंत्र चर्चा चालू अधिवेशनात घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मान्य केली.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSubhash Desaiसुभाष देसाई