शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षाला डावलले

By admin | Updated: November 11, 2015 02:21 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण करण्याच्या समारंभासाठी विरोधी पक्षांना आमंत्रित न करण्यात आल्याबद्दल मंगळवारी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे लोकार्पण करण्याच्या समारंभासाठी विरोधी पक्षांना आमंत्रित न करण्यात आल्याबद्दल मंगळवारी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. संघ मानसिकतेच्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार, असा सवाल प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. लंडनमधील या घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबरला होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील वा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, हा समारंभ अतिशय छोटेखानी असेल. डॉ. आंबेडकर यांचे ते घर निवासी वस्तीमध्ये असल्याने त्या ठिकाणच्या नियमानुसार मोठा समारंभ, ध्वनिक्षेपण व्यवस्था असे करता येत नाही. त्यामुळेच मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लोकार्पणाचा समारंभ होईल. सचिन सावंत यांनी आरोप केला की संघ मानसिकतेच्या राज्य सरकारने विरोधी पक्षांना इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाचेदेखील आमंत्रण दिलेले नव्हते. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना इंदू मिलच्या समारंभाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले होते. (विशेष प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेबांचे घर खरेदी करण्यासाठीची बोलणी करणे आणि पाहणी यावर मंत्री, अधिकाऱ्यांच्या लंडन भेटीवर आतापर्यंत २५ लाख ४५ हजार रुपये खर्च झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत शासनाकडून माहिती मिळविली. या घर खरेदीच्या व्यवहाराचा एक भाग म्हणून सॉलिसिटर कंपनीला ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले. घराची किंमत म्हणून ३२ कोटी रुपये मेसर्स सेडॉन या सॉलिसिटर कंपनीच्या खात्यात राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेमार्फत जमा करण्यात आले आहेत.