जनसुराज्य पक्षाला दोन महामंडळांवर संधी; गायकवाड, कदम यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:20 IST2019-09-05T18:18:50+5:302019-09-05T18:20:17+5:30
नुकतेच जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या कर्णसिंह गायकवाड आणि अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करणारे समित कदम यांना पदं देवून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले आहे.

जनसुराज्य पक्षाला दोन महामंडळांवर संधी; गायकवाड, कदम यांची वर्णी
मुंबई : भाजपाचा सहावा घटक पक्ष म्हणून सतेत सहभागी झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन भाजपकडून महत्वाची पदं देण्याती आली आहे. जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळ उपाध्यक्ष पद व शाहुवाडीचे कर्णसिंह गायकवाड यांना यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे.
नुकतेच जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या कर्णसिंह गायकवाड आणि अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करणारे समित कदम यांना पदं देवून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले आहे. पिशवी येथे झालेल्या सभेत विनय कोरे व कर्णसिंह गायकवाड यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केले होते. या पदामुळे दिवंगत संजयसिंह गायकवाड यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची चर्चा शाहुवाडी तालुक्यात होत आहे.