"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:14 IST2025-06-12T12:12:17+5:302025-06-12T12:14:00+5:30
Nana Patole On Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत नाना पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केले.

"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर देशभरातून सैन्याचे कौतुक झाले. परंतु, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख लहान मुलांचा व्हिडीओ गेम म्हणून केला.
"भारताने हल्ल्याआधीच पाकिस्तानला पूर्वकल्पना दिली. त्यानंतर पाकिस्तानने आपली माणसे तिथून हटवली. शिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले", असेही पटोले म्हणाले.
VIDEO | Congress leader Nana Patole on Operation Sindoor said: “The sindoor of 26 women in Pahalgam was wiped away, and the terrorists responsible have still not been found. Operation Sindoor was halted for trade interests. Trump said a dozen times that trade would stop with both… pic.twitter.com/01MQlQ3cDY
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, "भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले. त्यावरून असे स्पष्ट होत आहे की, भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरबाबत पूर्वकल्पना दिली. तसेच तुमच्या लोकांना तिथून हटवा, असे सांगण्यात आले. याचा अर्थ असा की, लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला."