शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

Ganeshotsav Guidelines 2021: लाडक्या बाप्पाचं केवळ ऑनलाईन दर्शन घेता येणार; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 6:08 PM

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावेया वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावेश्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.

मुंबई – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने अनेकांची चिंता वाढली आहे. राज्यातही ५ जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण आढळल्याने खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सरकारकडून वारंवार गर्दी टाळण्याचं, कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता राज्यात गणेशोत्सवामुळे सरकारनं विशेष खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोविड १९(Covid 19) उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Maharashtra Government and BMC Issues New Guidelines For Ganeshotsav 2021)

काय आहे नियमावली?

  1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
  2. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका किंवा संबंधित प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असून घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे, मुर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
  5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.
  7. लागू करण्यात आलेले निर्बंध वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कुठलीही शिथिलता देता येणार नाही.
  8. आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणांसंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे
  9. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाचा मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

मुंबई महापालिकेचे निर्बंध

  1. गणपती आगमनावेळी केवळ १० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणपती आणताना केवळ ५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. गणेश मंडपात बाप्पाचं दर्शन घेण्यापासून लोकांना बंदी घातली आहे.
  2. मंडळाने गणपतीचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. गर्दी टाळणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. प्रसिद्ध मंडळांनाच समुद्रात गणपती विसर्जन करण्याची परवानगी आहे. विसर्जनावेळी केवळ १० लोकांना उपस्थित राहता येईल.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव