शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपर्यंत कांदा रडवणार

By admin | Updated: July 29, 2015 00:58 IST

मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्यामुळे राज्यभर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पिकांची अद्याप लागवड झाली नसून ते पीक मार्केटमध्ये येईपर्यंत तेजी कायम राहणार आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईमागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्यामुळे राज्यभर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पिकांची अद्याप लागवड झाली नसून ते पीक मार्केटमध्ये येईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात असून दिवाळीपर्यंत बाजारभाव वाढतच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गतवर्षी झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याचे उत्पन्न कमी झाले होते. कांद्याचा दर्जाही हलका असल्यामुळे तो जास्त दिवस साठवता आला नाही. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्येच बराचसा कांदा विकला. प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये कांद्याचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. परंतु या वर्षी जुलै अखेरीसच प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक खूपच कमी असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ६४ ट्रक व ३९ टेम्पोंमधून कांदा विक्रीला आला आहे. होलसेल मार्केटमध्ये कांदा २६ ते ३६ रुपये किलोने विकला गेला. चांगल्या दर्जाचा कांदा ४० रुपये किलो दरानेही विकला गेला. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. जुलैमधील हा विक्रमी दर असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळी कांद्याचा साठा कमी असून पोळ कांद्याची लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही.-राज्यात कांद्याचे दर वाढू लागले आहेत. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये एक किलोसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील जवळपास तीन महिने भाव वाढत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. -भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.