शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:16 IST

सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा तो ‘एसएमएस’ ने काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकला आणि....

ठळक मुद्दे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न

पुणे: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत सहयोगी राज्यसभा खासदार असलेले संजय काकडेकाँग्रेसवासी होण्याचा पक्का निर्धार केला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री मला भावासारखे आहे. पण त्यांनीच मला लाथाडले असे वाक्य वापरुन काँग्रेसमध्ये खासदारकीची जागा चाचपत होते. मात्र, सर्वच पक्षात आपले गुणगान गाणारे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करणारेच लोक असतील असे ‘नेहमी’गृहीत धरणे तसे चुकीचेच.. आणि त्याच धर्तीवर लवकरच कॉग्रेसजन होण्यास उत्सुक असलेल्या संजय काकडेंविषयीचा  ‘एसएमएस’ काँग्रेस हायकमांडच्या मोबाईल वर झळकला आणि काकडेंच्या पक्षातरांच्या सुसाट गाडीला ‘रेड सिग्नल’ मिळाला...मग पुन्हा तोच भाऊ कामाला आला आणि अखेर हे बंड थंडावले..       लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी संजय काकडे दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न करत होते, तसे त्यांनी पुण्यात जाहीरही केले, मात्र, त्यांचा पत्ता पुण्यातूनच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीला कट करायला लावला. त्यासाठी फक्त एक एसएमएस उपयोगी पडला. दिल्लीतील पक्षाच्या महत्वाच्या व्यक्तींना हा एसएमएस पाठवण्यात आला. त्यात काकडे यांची सगळी पार्श्वभूमी देत पक्षाचा एबी फॉर्म घेऊन हे उमेदवार गायब होऊ शकतात असे म्हटले होते. तसेच त्यांच्या बांधकाम व्यवसायातील काही गुप्त गोष्टींची माहितीही पुरवण्यात आली होती. त्यामुळेच काकडे यांनी ज्यावेळी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली, त्यावेळी खर्गे यांनी त्यांना प्रथम तुम्ही पक्षात प्रवेश करा, त्यानंतरच तुमच्या उमेदवारीचे ठरवता येईल असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यानंतरच काकडे यांनी काँग्रेकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सोडून दिले व पुन्हा मुख्यमंत्र्यांबरोबर जुळवून घेतले.काकडे यांच्याबाबत काँग्रेसचे राज्यातील काही वरिष्ठ नेते आग्रही होते. दिल्लीपर्यंत त्यांचे नाव पोहचवण्यात याच नेत्यांचा हात होता. महापालिकेत काकडे यांची मोठी ताकद आहे, त्यांना उमेदवारी दिली की ही ताकद आपल्या पक्षाकडे वळेल असे दिल्लीत या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवले होते. त्यावर विचारही सुरू होता, मात्र नेमका त्याचवेळी काँग्रेसच्या येथील काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट खर्गे व अन्य नेत्यांना तो एसएमएस पाठवला. त्यात काकडे कसे बेभरवशी आहेत व त्यांच्यामुळे पक्षाची नाचक्की होण्याची दाट शक्यता कशी आहे ते स्पष्ट करण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यामुळेच काकडेंचा पत्ता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कट केला. तुम्ही आधी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करा, त्यानंतरच तुमच्या उमेदवारीचा विचार होईल असे त्यांना सांगण्यात आले. काकडे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या मुदतीची अद्याप दीड वर्षे शिल्लक आहेत. ते भाजपाचे अधिकृतपणे सहयोगी सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश केला असता तर त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीला धोका होता. काँग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना ते पक्षात नकोच होते. त्यामुळेच त्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करण्यापेक्षा थेट वरिष्ठांबरोबरच संपर्क साधून त्यांचा पत्ता कट करण्याचा डाव पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. 

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक