शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायिक वादातून एकाचा खून

By admin | Updated: July 31, 2014 01:24 IST

अकोला तालुक्यातील घटना: एकाची प्रकृती गंभीर, तीन आरोपी ताब्यात.

अकोला: पूर्ववैमनस्यातून तीन आरोपींनी एका पानपट्टी व्यवसायिकासह दोघांवर कुर्‍हाड आणि गुप्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अकोलानजिकच्या घुसर येथे घडली. जखमींपैकी एकाचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला तर दुसर्‍या युवकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घुसर येथील गोपाल भाऊराव ठाकरे(३२) हे घुसर येथील बसथांब्यानजिक पानपट्टी चालवतात. त्यांच्या पानपट्टीसमोर गजानन जनार्दन पागृत (३२) यांचीसुद्धा पानपट्टी आहे. दोघांमध्ये व्यवसायिक कारणावरून दोन वर्षांपासून वाद सुरू आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोपाल ठाकरे यांनी पानपट्टी उघडली. त्याचवेळी आरोपी गाजानन पागृत, त्याचा मोठा भाऊ संतोष जनार्दन पागृत(३८) आणि त्याचा भाचा दीपक भांबेरे (१८) हे कुर्‍हाड व गुप्ती घेवून आले. त्यांनी गोपालसोबत वाद घातला आणि काही कळण्याच्या आतच तिघांनी गोपालवर कुर्‍हाड व गुप्तीने हल्ला चढविला. त्याचे डोक्यावर आणि पोटावर कुर्‍हाडीने तसेच गुप्तीने वार केले. गोपालच्या पानपट्टीपासून काही अंतरावरच त्याचे काका भानुदास श्यामराव ठाकरे (४0) यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. यात हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात हलविले जात असताना, भानुदास ठाकरे यांचा वाटेतच मृत्यू झाला. गोपालची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. *मित्र बनले एकमेकांचे वैरीगावकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल ठाकरे व गजानन पागृत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दोघांनी मिळून घुसर बसथांब्यावर पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला. परंतू काही वर्षातच त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर गोपाल याने स्वत:ची वेगळी पानपट्टी सुरू केली. त्यामुळे गजाननच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आणि दोघेही एकमेकांचा द्वेष करू लागले. या द्वेषाची परिणती बुधवारी हत्याकांडात झाली.