one killed and 16 injured in ST Bus Accident on Mumbai Pune Express Way | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 16 जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 16 जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway ) एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बसला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. 

एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला आहे. वाहतूक पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: one killed and 16 injured in ST Bus Accident on Mumbai Pune Express Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.