शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर उपचाराअभावी एकाचा मृत्यू

By admin | Updated: May 25, 2014 05:43 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या पुणे विमानतळावर अचानक प्रवाशाचे किंवा कर्मचार्‍याची तब्येत बिघडल्यास प्राथमिक आरोग्य सुविधाही उपलब्ध नाही

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या पुणे विमानतळावर अचानक प्रवाशाचे किंवा कर्मचार्‍याची तब्येत बिघडल्यास प्राथमिक आरोग्य सुविधाही उपलब्ध नाही. त्यामुळे बुधवारी एक जणाला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातही एका विमानतळावरील कर्मचार्‍याला त्वरीत उपचार सुविधा न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पुणे आंतरराष्टÑीयस्तरावर आयटी व ऐतिहासिक शहर म्हणून नावाजलेले आहे. त्यामुळे परदेशातून अनेक जण पुण्यातला भेट देतात. पुणे विमानतळावर दररोज ५० पेक्षा जास्त विमानांच्या फेर्‍या होतात. तसेच हजारो प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा विमानतळावर असणे आवश्यक आहे. या सुविधा नसल्यामुळे बुधवारी लक्ष्मण नाटेकर या एअरपोर्ट वृत्तपत्र विक्रेत्याला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी सकाळी ६. १० वाजता ते एअरपोर्ट मध्ये असणारे त्यांचे वृत्तपत्र व पुस्तकांचे दुकान उघडत होते. तेव्हा दुकान उघडल्यानंतर अचानक ते कोसळले. तेव्हा एअरपोर्टवर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा व अ‍ॅम्बुलन्सही नव्हते. तसेच त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी एअरपोर्टवर ७.२५ वाजता गाडी मागविण्यात आली. तेथून त्यांना ससून रूग्णालयात नेण्यात आले. रूग्णालयात त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. कर्मचार्‍याचाही गेला प्राण दरम्यान, ४ एप्रिल २०१४ रोजी स्पाईस जेटच्या पद्मनाभन या कर्मचार्‍याला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यालाही उपचार उपलब्ध झाले नव्हते.