मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:57 PM2021-07-01T18:57:28+5:302021-07-01T19:13:34+5:30

Mahadev jankar : एक दिवस रासपचा पंतप्रधान होणारच, जानकर यांचा निर्धार. रासपचं अंतिम ध्येय दिल्लीच, जानकर यांचं वक्तव्य.

one day i will become a prime minister of india says maharashtra former minister mahadev jankar | मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर

मी झालो नाही तरी ठीक, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान बनावा हीच अपेक्षा : महादेव जानकर

googlenewsNext
ठळक मुद्देएक दिवस रासपचा पंतप्रधान होणारच, जानकर यांचा निर्धार.रासपचं अंतिम ध्येय दिल्लीच, जानकर यांचं वक्तव्य.

"आज रासपंचे दोन आमदार आहेत. त्यानंतर २५ होतील, काही खासदारही होतील. रासपचं अंतिम ध्येय हे दिल्ली आहे. भविष्य काळात जानकर पंतप्रधान नाही झाले तरी रासपचा पंतप्रधान नक्कीच होईल," असा निर्धार रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ४ जून रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जानकर यांनी कोल्हापुरात भेट दिली. पक्षाच्यावतीनं ४ जुलैला आंदोलन केलं जाणार आहे. आज रासपच्या शिष्टमंडळानं ओबीसींनी न्याय मिळावा यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ४ जुलैला प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे चक्काजाम आंदोलन होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरवासीयांना आव्हान करण्यासाठी आलोय. कोल्हापुरवासीयांनीही यात रासपला सहकार्य करावं यासाठी मी कोल्हापुरात आलो आहे," असं जानकर म्हणाले.  

"आज पक्षाचे दोन आमदार आहेत, उद्या २५ होती, काही खासदार होती. कधी ना कधी रासपची ताकद ही वाढेलच. या देशाचा पंतप्रधान म्हणून मला संधी मिळेल. मी जरी नाही झालो तर रासपचा माणूस पंतप्रधान होईल, त्यासाठी मला कोणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल," असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: one day i will become a prime minister of india says maharashtra former minister mahadev jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.