व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:06 IST2019-09-26T14:49:07+5:302019-09-26T15:06:52+5:30

व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे.

Older Women Video Viral | व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात

व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात

मुंबई - निवडणुकीचा काळ सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून सर्वच पक्षाकडून सभा व कार्यक्रमांच्या आधी पक्षाचे गीत लावले जातात. अशाच एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला असून, ज्यात एक आजीबाईं शिवसेननेच्या गीतावर जोरदार थिरकताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आर्मी या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

सभेत गर्दी जमावी किंवा नेत्यांच्या स्टेजवरील आगमना आधी उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाचे गीत वाजवले जातात. तर अनेक ठिकाणी अश्या गीतांवर तरुण थिरकताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र तरुणांसुद्धा लाजवेल असा नृत्य करतानाचा एका आजीबाईंचा व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमत्ताने शिवसेनेकडून महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. आशाच एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यात पक्षाच्या 'शिवसेना,शिवसेना, शिवसेना' या गीतावर चक्क आजीबाई थिरकताना पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

 

 

 

 

Web Title: Older Women Video Viral