शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अरे रे, संधी हुकली!

By admin | Updated: July 10, 2014 23:28 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेहमीच वादाचा विषय ठरत असताना यंदा संमेलन स्थळ हाच मुख्य वादाचा विषय झाला आहे.

पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेहमीच वादाचा विषय ठरत असताना यंदा संमेलन स्थळ हाच मुख्य वादाचा विषय झाला आहे. स्थळासाठी चर्चेत असणा:या बडोदा येथे संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी संयोजकांनी केली होती; परंतु संमेलन स्थळासाठी पंजाबवर शिक्कामोर्तब झाल्याने ही संधी हुकल्याची चर्चा साहित्यविश्वात रंगली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेरच आयोजित करण्याच्या उद्देशाने यंदाचे 88वे साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान गावी निश्चित झाले आहे; परंतु पंजाबला मराठी माणसे किती असणार, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी भाषेच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येणा:या साहित्य संमेलनाचा उद्देश कितपत साध्य होईल, याविषयी मोठे प्रश्नचिन्ह        आहे. 
याउलट चर्चेत असणा:या बडोद्याला मराठी भाषिकही जास्त असून, अनेक वर्षापासून ठराव करण्यात येणा:या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणीही या वेळी जोर धरणार होती, अशी माहिती बडोदा मराठी साहित्य परिषदेचे दिलीप खोपकर यांनी दिली. त्यामुळे आजवर राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेते मंडळी साहित्य संमेलनाला लाभले असले, तरी पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही प्रथमच वेळ असती. 
पंतप्रधान मोदी व लोकसभेच्या सभापती सुमित्र महाजन यांच्या उपस्थितीने संमेलनाला एक वेगळीच उंची प्राप्त होण्याची संधी होती. ही पाश्र्वभूमी ठाऊक असतानाही बडोद्याचा प्रस्ताव डावलून पंजाबची निवड म्हणजे ‘हातचे सोडून..’ असे असल्याची चर्चा रंगली आहे. 
बडोदा मराठी साहित्य परिषदेने मनाचा मोठेपणा दाखविला असला, तरी आता पंजाबमधील संमेलन आयोजकांवर त्याच्या तोडीस तोड आयोजनाची जबाबदारी आली आहे. (प्रतिनिधी)
 
4‘‘आम्ही गेली 4 वर्षे संमेलन बडोद्यात व्हावे म्हणून मागणी करत आहोत. या वेळी बडोदा येथे संमेलन होईल, अशी शक्यता अधिक वाटत होती. पंतप्रधान मोदी मराठी बोलतात, मराठी वाचनही करतात. त्यांचे मराठीवरील हे प्रेम ओळखून त्यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याची इच्छा होती. या निमित्ताने अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ठेवण्यात येणारी मागणीही पंतप्रधानांपुढे मांडण्यात येणार होती, जेणोकरून त्याची व्याप्ती व वजनही वाढेल, असे वाटले होते; परंतु संमेलन येथे झाले नाही, तरी पुढच्या वर्षी पुन्हा निमंत्रण पाठविणार आहे,’’ असे दिलीप खोपकर म्हणाले. 
 
4बडोद्याचा प्रस्ताव डावलून पंजाबची निवड म्हणजे ‘हातचे सोडून..’ असे असल्याची चर्चा रंगली आहे.
4संमेलन मिळाले असते, 
तर पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता असती.