शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांनी रेशनिंग दुकान चालवावे

By admin | Updated: February 11, 2015 06:19 IST

रेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि तुटपूंजे कमिशन देत प्रशासन रेशनिंग दुकानदारांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप

चेतन ननावरे, मुंबईरेशनिंग कोट्यात केलेली कपात आणि तुटपूंजे कमिशन देत प्रशासन रेशनिंग दुकानदारांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेने केला आहे. त्यामुळे यापुढे प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दुकानात बसून प्राप्त कोट्यात दुकान चालवून दाखवण्याचे खुले आव्हान संघटनेने दिले आहे.रॉकेलच्या कोट्यात केलेली कपात आणि एपीएल धारकांचे बंद केलेले धान्य यामुळे दुकानांवर रोजच रेशनिंगकार्डधारकांसोबत खटके उडत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष नविन मारू यांनी दिली. मारू म्हणाले, रेशनिंगकार्डधारकांना रॉकेलच्या कोट्यात झालेल्या कपातीवर विश्वास नाही. परिणामी दुकानदारांवर काळा बाजार केल्याचा आरोप होत आहे. याउलट एपीएल धारक धान्य पुरवठा कधी करणार असा सवाल वारंवार विचारत आहे. मात्र प्रशासनाकडून धान्य पुरवठा पुन्हा सुरू होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कारण एक दुकान चालवण्यासाठी किमान ५० हजार रुपये खर्च येत आहे. मात्र कमिशनरुपात मिळणारी रक्कम पाहता दुकानदारांना नफा तर दूरच मात्र स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करावे लागत आहे. परिणामी तोट्यात असलेल्या दुकानदारांसमोर दुकान बंद करणे किंवा भ्रष्टाचार करणे हे दोनच पर्याय उरल्याचे संघटनेने स्पष्ट केले.प्रत्येक दुकानात रेशनिंग कोट्याचा हिशेब ठेवण्यासाठी एक कारकून असतो. हा कारकून रेशनिंगचे वाटप करताना पावत्या तयार करण्यापासून दुकानातील मालाची नोंद ठेवण्याचे काम करतो. रेशनिंग वाटण्यासाठी एक मजूर आवश्यक असतो. दुकानाच्या भाड्यासह कारकून व मजूराच्या पगाराचा भार हा दुकानचालकावर असतो. शिवाय वीजबिल व नोंद ठेवण्यास आवश्यक नोंदवही, पेन आणि इतर साहित्यासह वीजबिलाचा खर्चही दुकानदाराच्या माथी मारला जातो.