शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पैशासाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 09:18 IST

एककाळ असा होता की वैद्यकीय क्षेत्र हे सेवाधिष्ठित मानले जायचे. मात्र आज या क्षेत्राचा व्यवसाय झाला आहे

ठळक मुद्दे खासगी एजन्सींमार्फत पाठविल्या जातात सातासमुद्रापारशासकीय रूग्णालयात परिचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त शिक्षण, नोकरी, पदे अशा सर्वस्तरावर परिचारिकांची गळचेपी सुरूनर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या काही परिचारिकांचा देखील परदेशात नोकरी करण्याकडे वाढता कल

पुणे :  वैद्यकीय क्षेत्रात खासगी एजन्सींनी आता  शिरकाव केला असून, परिचारिकांना क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण देत त्यांच्या परीक्षा घेऊन परदेशात पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. परिचारिका सेवेतील कमी पगार, सोयी-सुविधांचा अभाव, रिक्त पदांचा अतिरिक्त भार, बदल्या अशा स्थितीमुळे परिचारिकांचाही ओढा सातासमुद्रापार जाण्याकडे वाढत चालला असल्याचे समोर आले आहे.     एककाळ असा होता की वैद्यकीय क्षेत्र हे सेवाधिष्ठित मानले जायचे. मात्र आज या क्षेत्राचा व्यवसाय झाला आहे. परिचारिका सेवा देखील त्याला आता अपवाद राहिलेली नाही. परिचारिका झोकून देऊन काम करीत असल्या तरी अद्यापही त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या अत्यंत कमी आहे. रूग्णालयांमध्ये परिचारिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी त्यातुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. शासकीय रूग्णालयात परिचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत, ती शासनस्तरावर भरली गेलेली  नाहीत. या रिक्त पदांचा ताण परिचारिकांवर येत आहे. परिचारिकांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत. अकरा महिन्याच्या करारावर परिचारिकांना ठेवले जात आहे. शिक्षण, नोकरी, पदे अशा सर्वस्तरावर परिचारिकांची गळचेपी सुरू आहे.  मग परिचारिकांनी सेवा द्यायची कशी? असा सवाल उपस्थित करीत या समस्यांमुळे पैशांसाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढला असल्याची माहिती महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी  ‘लोकमत’शी बोलताना दिली.     आज खासगी रूग्णालयात केरळच्या परिचारिका मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. कारण या नर्सेस सर्वप्रकारचे काम करण्यास तयार असतात. दुस-या राज्यातून परिचारिका आणण्यासाठी एजन्सी आणि एजंट आहेत. दोन वर्षे त्यांचे खासगी रूग्णालयात टेÑनिंग पूर्ण झाल्यानंतर या परिचारिकांना परदेशात पाठविले जाते. पुण्यातही अशा काही एजन्सी आहेत ज्या खासगी क्लासेसच्या माध्यमातून परिचारिकांना शिक्षण देतात. त्यानंतर त्यांची परीक्षा घेत त्यामधील चांगल्या परिचारिकांची निवड करीत त्यांना परदेशाची स्वप्ने दाखविली जातात. शासकीय रूग्णालयातील अनेक स्टाफ परिचारिका याला भुलल्या आहेत. त्यांची परीक्षा देऊन परदेशात नव-यालाही नोकरी देण्यात आली आहे. मात्र काहींच्या पदरी अपयश देखील आले आहे. बीएससी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या काही परिचारिकांचा कल देखील परदेशात नोकरी करण्याकडे वाढत आहे. या एजंन्सीच्या माध्यमातून परदेशातील खासगी रूग्णालयात त्यांना नोकरी दिली जाते. त्यांची राहाण्याची-खाण्यापिण्याची सोय केली जाते. शासकीय आणि खासगी रूग्णालयातील सेवेपेक्षा त्यांना चांगले पैसे मिळत असल्याने परिचारिकांची पावले परदेशाकडे वळली आहेत. काही वर्षांपूर्वी एक एजन्सी आमच्या अध्यक्षांकडे आली होती. आम्हाला काही परिचारिका मिळतील का? मात्र त्यांनी नकार दिला होता. आता परिचारिका ही सेवा राहिली नसून, तो एक धंदा झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. --------------   नोकरी आणि पैसा याचा विचार करून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी परदेशी जाण्यास प्राधान्य देतात. हे खरं आहे. वर्षातून किमान दहा मुले परदेशात जात आहेत- सावता विठोबा माळी, प्रशासकीय अधिकारी, सिहंगड कॉलेज आॅफ नर्सिंग

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरWomenमहिला