शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

आता ‘त्या’ डॉक्टरांवरही गुन्हा नोंदवता येणार!; विशेष पोलीस कक्षाची नियुक्ती करा, न्यायालयाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:24 AM

court : वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत गुन्हा नोंदविण्याकरिता विशेष प्रशिक्षित पोलिसांचा कक्ष नेमू शकता. अशा स्वरूपाच्या तक्रारी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पाठवू नका.

मुंबई : वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉक्टरांवर गुन्हा नोंदवण्यासाठी विशेष प्रशिक्षित पोलिसांच्या कक्षाची नियुक्ती करण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी केली.डॉक्टरांच्या संरक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेला कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर गुन्हा कसा नोंदवायचा याबाबत दिलेल्या निकालाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी राज्य सरकारला केली.वैद्यकीय हलगर्जीपणाबाबत गुन्हा नोंदविण्याकरिता विशेष प्रशिक्षित पोलिसांचा कक्ष नेमू शकता. अशा स्वरूपाच्या तक्रारी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पाठवू नका. प्रशिक्षित पोलीस अधिकाऱ्याकडेच पाठवा. सध्याच्या काळात पोलिसांनी असे गुन्हे नोंदविताना थोडी सावधानता बाळगावी. संबंधित प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत घ्यावे. खरोखरच वैद्यकीय हलगर्जीपणाचे प्रकरण आहे की नाही, हे पडताळून पाहावे. गुन्हा नोंदवण्याची घाई करू नये. अन्यथा डॉक्टर मोकळ्या मनाने काम करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.विशेष प्रशिक्षित पोलिसांचा कक्ष नेमण्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे, याची माहिती राज्य सरकारला १६ जूनपर्यंत देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

छळवणूक होता कामा नये!याचिकाकर्त्यांचे वकील राजेश इनामदार यांनी गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते की, कोरोनाच्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पोलीस नोटीस बजावत आहेत. कारण रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्याविरोधात तक्रार केल्या आहेत. काहींनी नातेवाईक गमावले आहेत. तर काही लोकांनी रुग्णांना मिळणाऱ्या उरपचारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर डॉक्टर्स चोवीस तास काम करत आहेत. त्यांची अशाप्रकारे छळवणूक होता कामा नये, याकडे लक्ष द्यावे, असे न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत म्हटले होते.

टॅग्स :doctorडॉक्टरCourtन्यायालय