शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चे आता मिशन मुंबई

By admin | Updated: February 11, 2015 06:18 IST

दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर

मुंबई : दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आता आपच्या नजरा मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीकडे वळल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारीला सुरुवात केली असून, आजच्या निकालाने त्याला आणखी बळ मिळणार असल्याचे ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक एक हजार स्वयंसेवकांचा जत्था मुंबई आणि महाराष्ट्रातील होता. शिवाय सर्वाधिक निधीही राज्यातूनच उभारण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली. मुंबई महापालिका आणि निवडणुकांसाठी आपने यापूर्वीच ‘मिशन विस्तार’ हाती घेतले आहे. आता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचा संच उभारण्यावर भर दिला जाईल. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले जाणार असल्याचे गांधी म्हणाले. आगामी दोन वर्षांत मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपने विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. केवळ एकापाठोपाठ निवडणूक लढविणे आमचा उद्देश नाही. या पराभवानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही वेळ घेतला. ‘मिशन विस्तार’ त्याचाच भाग होता. ग्रामीण आणि शहरी भागासाठी पक्षाने स्वतंत्र कार्यक्रम हाती घेतले असून, मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्याचे मयांक गांधी म्हणाले.शहरी भागात ‘स्वराज अभियान’ राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवरही स्वतंत्र समिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘आप’चा विस्तार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)