शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रति घर आकारणार करमणूक शुल्क

By admin | Updated: June 13, 2014 03:16 IST

प्र्रत्येक टीव्ही संचामागे वसूल करण्यात येणारा करमणूक कर आता घरटी एक जोडणी मानून आकारण्यात येणार आहे.

मुंबई : प्र्रत्येक टीव्ही संचामागे वसूल करण्यात येणारा करमणूक कर आता घरटी एक जोडणी मानून आकारण्यात येणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र करमणूक शुल्क सुधारणा विधेयक गुरुवारी विधान परिषदेत संमत करण्यात आले. यात कर न भरणाऱ्या केबलचालकाकडून ५० हजार रुपये दंड आकारणीची सुधारणा झाली.महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी हे विधेयक मांडले. करमणूक कर न भरणाऱ्या केबलचालकांकडून पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड आकारण्याऐवजी ही रक्कम २५ हजार रुपये करावी, अशी सुधारणा मूळ सुधारणा विधेयकात होती. परंतु विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दंडाच्या रकमेत वाढ सुचवून ती ५० हजार रुपये करावी, अशी मागणी केली व ती मान्य झाली. त्यानंतर हे सुधारित विधेयक विधान परिषदेत मांडले. महानगरांपासून तालुक्यापर्यंत केबल नेटवर्कर्ची मध्यवर्ती पद्धती असावी, प्रक्षेपण अचानक बंद करणे, महत्त्वाच्या घडामोडींच्या वेळी जाहिराती लावणे, कुटुंबाने एकत्रितपणे पाहणे शक्य नाही अशा गोष्टी दाखविणे अशा प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न या विधेयकात आहे, असे धस यांनी सांगितले. काही घरात दोन-दोन दूरचित्रवाणी संच आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक संचामागे, जोडणीमागे करमणूक कर घेणे अन्यायकारक आहे. हा कर प्रत्येक घरामागे घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. करमणूक कर गोळा करण्याची जबाबदारी केबलचालकावर टाकायची आणि कर गोळा करून भरण्यास विलंब झाला तर चालकाला दंड आकारायचा हे योग्य नाही. त्यापेक्षा शासनाने थेट गोळा करावा, असेही ते म्हणाले. त्यानंतर धस यांनी प्रत्येक घरामागे कर आकारण्याचे जाहीर केले. दिवाकर रावते, रामदास कदम, नीलम गोऱ्हे आदींनी चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)