शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

आता वेध निकालाचे

By admin | Updated: October 16, 2014 23:18 IST

19 तारखेला मतमोजणीच्या दिवशी काय होईल याचे अंदाज-आडाखे व्यक्त करण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आम्हीच जिंकू असे दावे करण्यात येत आहेत.

वसई :   19 तारखेला मतमोजणीच्या दिवशी काय होईल याचे अंदाज-आडाखे व्यक्त करण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आम्हीच जिंकू असे दावे करण्यात येत आहेत. उमेदवारांना केवळ 6क् तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. रविवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होईल व अवघ्या दोन तासात पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
बुधवारी एकुण 16 लाख 61 हजार 36 मतदारांपैकी 1क् लाख 71 हजार 568 मतदारांनी सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 5 लाख 68 हजार 242 पुरूष तर 5 लाख 3 हजार 268 महिला मतदार व इतर 58 यांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक मतदान पालघर येथे झाले. निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मतदारसंघनिहाय मतांची आकडे व टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. डहाणू येथे महिलांनी सर्वाधिक मतदान केले. येथे 78 हजार 1क्8 महिलांनी तर 76 हजार 636 पुरूष मतदारांनी मतदान केले. इतर 5 मतदारसंघात मात्र महिलांपेक्षा पुरूष मतदारांनी जास्त मतदान केले.
बुधवारी झालेले मतदान व टक्केवारी लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या सहाही मतदारसंघात सर्व राजकीय पक्षांना संमिo्र यश मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वसई, नालासोपारा येथे बविआ, पालघर - शिवसेना, बोईसर - भाजपा, डहाणू - मार्क्‍स. कम्यु., तर विक्रमगड - भाजपा असे वर्गीकरण होण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त होत आहे. वसई, नालासोपारा वगळता अन्य 4 मतदारसंघात 6क् हून अधिक टक्के मतदान झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. दरम्यान निवडणूक यंत्रणोने मतमोजणी सुलभरित्या व सुरक्षितरीत्या पार पडावी याकरीता विविध स्तरावर उपाययोजना केली आहे. 19 तारखेला दुपारी 12 वाजेर्पयत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज निवडणुक अधिकारी व्यक्त करीत आहेत. 
(प्रतिनिधी)
 
ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात
ठाणो : जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांत नुकतेच मतदान झाले. याद्वारे 238 उमेदवारांचे भवितव्य सुमारे 944क् मतदान (ईव्हीएम) यंत्रंमध्ये ‘सील’ करण्यात आले. जिल्हाभरातील 3क् लाख 9 हजार 835 मतदारांनी त्यांचे मतदान ईव्हीएम मशीनमध्ये लॉक केले आहे. त्याची मतमोजणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोर्पयत या मतदान यंत्रंना ठिकठिकाणी केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या जवानांसह पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवले आहे. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील 59 लाख 9क् हजार 767 मतदारांपैकी 5क्.61 टक्के म्हणजे 3क् लाख 9 हजार 835 मतदारांनी मतदान केले.  सहा हजार 145 मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदानास मतमोजणीर्पयत कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवले आहे.  मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणीच तीन दिवसांनी मत मोजणी होऊन 238 उमेदवारांमधून 18 विजयी उमेदवार घोषित केले जाणार आहेत. तोर्पयत त्यांची सुरक्षा करण्यात येत आहे. यानुसार, या जवानांनी आपापले कौशल्य पणाला लावून सुरक्षा व्यवस्था या मतमोजणी केंद्रांवर तैनात केली आहे.
 
कौल कुणाला 
उत्सुकता कायम !
4विक्रमगड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तसा हा मतदारसंघ पूर्वी भाजपाच्या हाती या मतदारसंघात ठाकूर समाज, कोकणी समाज व वारली समाज या तीनही समाजाचे मोठय़ा प्रमाणात मतदार असून एकूण 12 उमेदवार रिंगणात त्यामध्ये भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी याचार पक्षामध्येच चुरशीची लढाई पहायला मिळणार आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रत एकुण 2,46,333 मतदार असून त्यापैकी 6क् टक्के मतदान झाले असून त्यावर चार उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
4जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड गटातून मतदान झाले असून काही बिगर आदिवासी गावतील लोकांनी बहिष्कारामुळे जी मते उमेदवारांना पडणार होती तीही पडली नाही. या भागातील भाजपाच्या उमेदवारबद्दल मोठय़ा प्रमाणात असलेल्या नाराजीचा फटका भाजपाला बसणार अशी चर्चा आहे.
4 आदिवासी तालुक्यातील महत्वाच्या मुद्या पिण्यासाठी पाणी, तरूणांना रोजगार, विस्थापितांचे पुनर्वसन, प्लॉटधारकांचे समस्या, आरोग्य अशा महत्वाच्या प्रश्नांवर गेले अनेक वष्रे राजकारण सुरू आहे. परंतु या मूलभूत समस्या सुटलेल्या नाही.
4गेल्या अनेक वर्षापासून राहिलेल्या आघाडय़ा युत्या स्वतंत्र लढल्याने त्यामुळे आता कुणाला कौल मिळणार याची उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता 19 ऑक्टोबरला संपणार आहे.  कोणाच्या पारडय़ात किती मतदारानी मतदान केले हे ही स्पष्ट होईल.