आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:14 PM2022-01-05T14:14:48+5:302022-01-05T14:15:04+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात टोपे यांनी माहिती दिली.

Now the antigen of RTPCR? Will there be a lockdown in the state? Health Minister Rajesh Tope clearly stated | आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

Next

मुंबई - राज्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारही सतर्क आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हटले, राज्यात सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही. पण ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढेल त्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांसंदर्भात विचार करण्यात येईल. याच बरोब, गर्दीच्या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे आता RTPCR ऐवजी अँटिजन टेस्टवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.

आता क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात टोपे यांनी माहिती दिली. आता क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा असणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणे बंधनकारक आहे. याशिवाय, अँटिजन टेस्ट झाल्यानंतर RCPCR करण्याची गरज नाही. 90 टक्के रुग्णांना तर कोरोनाची लक्षणेही नाहीत. पण असे असले तरीही लोकांनी गर्दी टाळायला हवी. असेही टोपे म्हणाले. 

मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड -
कोरोनाचा धोका वाढल्याने आता मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा कंबर कसून कामाला लागले आहेत. तसेच, लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देणेही आवश्यक असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. 

अशी आहे राज्याची स्थिती -
राज्यात मंगळवारी तब्बल 18 हजार 466 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचं मुंबई हे केंद्र ठरताना दिसत आहे. मुंबईत आज 10 हजाराहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजार 558 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 66 हजार 308 सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात काल दिवसभरात 75 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 40 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा 653 इतका झाला आहे. यातील 408 रुग्ण मुंबईत आहेत. तर पुण्यात 71 रुग्णांची नोंद आहे. 

Web Title: Now the antigen of RTPCR? Will there be a lockdown in the state? Health Minister Rajesh Tope clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.