शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:17 IST

"कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण."

मुंबई - शिवसेनेच्या बाबतीत जे झाले, तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोकांचा आहे. पण राष्ट्रवादी येथे बसलेल्या सर्वांची आहे आणि तेथे गेलेल्या सर्वांनी राष्ट्रवादीसाठी काम केले आहे. आपल्या सर्वांची ही राष्ट्रवादी नामशेश करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे, अशी भूमिका ठेऊन कुणी काम करत असेल, तर आज सर्वांनी विचार करायला हवा. आजूनही वेळ गेलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी अमोल कोल्हे यांनाही शरद पवार यांच्या समोरच मोठी ऑफरही दिली आहे. ते शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, "शरद पवारांचा झंजावात महाराष्ट्रात फिरायला लागला, तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुनूक आपण सातारा आणि कराडमध्ये पाहिली आहे. वय कितीही झाले असले तरी या नेत्याचा संपूर्ण भारतात दरारा आहे, यावेळी जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या एका क्लिपचाही उल्लेख केला.

साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा -कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे, पक्षात चर्चा केल्याशिवाय कारणे बरोबर नाही. पण आता पक्षातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रात फिरू आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा स्वाभीमानी बाना महाराष्ट्राने कसा जपला आहे. हे सांगायचे काम तुम्ही करा. संपूर्ण महाराष्ट्र साहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार, असा मला विश्वास आहे, अशी ऑफरही पाटिल यांनी कोल्हे यांना दिली.

'त्या' लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत, हे लक्षात ठेवा -आणखी खाते वटप झालेले नाही. मला काळजी आहे, की, उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे गेले त्यांची तक्रार काय होती. जर तीच तक्रार पुन्हा एकदा येऊन बसली असेल. तर त्या लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत. हे लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या मनात एवढी भीती मी महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिली नव्हती. म्हणून अमोल कोल्हे यांच्या मनात आलेला विचार, 'कशासाठी आहे हे राजकारण'. काही भूमिका, काही दिशा मानसाच्या मानात नेहमीच हवी, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या सोबत राहण्याची शपथही दिली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे