शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी कैद्यांकडून घेतल्या जाणार सूचना - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 4:55 AM

राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी विशेषत: महिला कैदी व आरोपींचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला महिलांकडून सूचना मिळाव्यात यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी विशेषत: महिला कैदी व आरोपींचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला महिलांकडून सूचना मिळाव्यात यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.देशातील सर्व राज्यांतील कारागृहात महिलांचे, कैदी महिलांच्या मुलांचे अधिकार अबाधित ठेवण्यात येतात की नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना दिले. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने यासंबंधी सुनावणी घेण्यासाठी न्या. मृदूला भाटकर व न्या. रेवती मोहिते-डेरे यांचे विशेष खंडपीठ नेमले. कारागृहांची स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच आरोपी व कैदींना दिल्या जाणाºया सुविधांबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. त्याशिवाय आरोपी किंवा कैदी महिलांना त्यांच्या अल्पवयीन मुलांना भेटण्यास देतात की नाही, याबाबतही काही प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे, अशीही माहिती सरकारने खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्व कारागृहांत प्रत्येकी २० फॉर्म पाठवण्याचे निर्देश दिले. १० फॉर्म कैदी महिलांना तर १० फॉर्म आरोपी महिलांना भरण्यास देऊन त्यांची मते जाणून घेण्याची सूचना न्यायालयाने विधि प्राधिकरणाला केली आहे.‘जिल्हा विधि प्राधिकरण या कामासाठी पाचव्या वर्षाच्या विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊ शकतात. मात्र हे काम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण व्हायला हवे. महिला आरोपी व कैद्यांनी भरलेले फॉर्म गोपनीय ठेवण्यात येतील,’ असेही खंडपीठाने स्पष्ट केले.सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर विधि सेवा प्राधिकरण अहवाल तयार करेल. मात्र, जमवलेली माहिती संबंधित कारागृह प्रशासनाला उपलब्ध केली जाणार नाही, याची खात्री करा, असेही खंडपीठाने म्हटले. 

टॅग्स :jailतुरुंगHigh Courtउच्च न्यायालय