राज्यातील १३ साखर कारखान्यांना एफआरपीसाठी नोटीस, सांगलीतील दोघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:05 PM2021-03-13T17:05:06+5:302021-03-13T17:06:43+5:30

SugerFactory Frp Kolhapur sangli- राज्यातील गळीत हंगाम संपत आला असला तरी अजूनही राज्यातील १३ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. सुमारे ५५६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे देणे थकविणाऱ्या या कारखान्यांना साखर आणि मालमत्ता जप्तीची कारवाई का करु नये, अशी नोटीस साखर संचालक शेखर गायकवाड यांनी पाठविली आहे.

Notice for FRP to 13 sugar factories in the state, two in Sangli | राज्यातील १३ साखर कारखान्यांना एफआरपीसाठी नोटीस, सांगलीतील दोघांचा समावेश

राज्यातील १३ साखर कारखान्यांना एफआरपीसाठी नोटीस, सांगलीतील दोघांचा समावेश

Next
ठळक मुद्देराज्यातील १३ साखर कारखान्यांना एफआरपीसाठी नोटीससांगलीतील दोघांचा समावेश

कोल्हापूर/सांगली : राज्यातील गळीत हंगाम संपत आला असला तरी अजूनही राज्यातील १३ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. सुमारे ५५६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे देणे थकविणाऱ्या या कारखान्यांना साखर आणि मालमत्ता जप्तीची कारवाई का करु नये, अशी नोटीस साखर संचालक शेखर गायकवाड यांनी पाठविली आहे.

एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात, सांगली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश नाही, उलट एफआरपी देण्यात येथील कारखाने आघाडीवर आहेत.

उस तुटल्यानंतर १५ दिवसांत एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा कायदा आहे. यानंतर शेतकऱ्यांना १५ टक्के दराने व्याज देणे बंधनकारक आहे. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांंची देणी थकविली जातात. राज्यातील १८३ साखर कारखान्यांकडून १६ हजार २७५ कोटी रुपये देणे बाकी आहे.

Web Title: Notice for FRP to 13 sugar factories in the state, two in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.