शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Maharashtra CM: महाराष्ट्रच नाही, भाजपासाठी चार राज्यांमध्ये राज्यपाल बनले गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 10:41 IST

गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन न करू शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मात्र, शनिवारी धक्का देत राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली. यानंतर लगेचच भाजपाचेदेवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षांत देशभरातील चार राज्यांमध्ये निवडणुकांनंतर राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपाने या राज्यांमध्ये बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली होती. 

मणिपूरमध्ये 2017 मध्ये 60 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेसचे 28 आमदार जिंकले होते. तर भाजपाचे 21 आमदार निवडून आले होते. राज्यपालांनी निवडणुकीनंतर युतीला आधार बनवून भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. यानंतर तेथे भाजपाचे सरकार बनले होते. 

गोव्यामध्येही 2017 मध्ये निवडणूक झाली होती. यावेळी काँग्रेस 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपाला सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले होते. काँग्रेस याविरोधात सर्वोच्च न्यायालयात मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शपथ रोखली नाही मात्र 16 मार्चला सकाळी 11 वाजता पर्रिकरांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 

मेघालयमध्ये 2018 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. यामध्ये 21 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र येथेही राज्यपालांनी भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलावले होते. भाजपाकडे केवळ 2 जागा होत्या आणि त्यांच्या सहकारी पक्ष नॅशनल पिपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या. 

कर्नाटकचा पुढील अंक आज महाराष्ट्रात घडत आहे. कर्नाटकमध्ये 2018 मध्ये राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते येडीयुराप्पा यांनी शपथही घेतली होती. मात्र, बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस जेडीएसची सत्ता आली. मात्र, भाजपाने पुन्हा त्यांचे 17 आमदार फोडत सत्ता स्थापन केली. आज या जागांवर पोटनिवडणूक होत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा