'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:10 IST2025-08-14T16:08:16+5:302025-08-14T16:10:48+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत महासत्ता आणि विश्वगुरू बनण्याबाबत विधान केले. त्यांनी तरुणांना एक मास्टर प्लॅन सांगितला.

'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारत महाशक्ती आणि विश्वगुरु होऊ शकतो असे सांगत यामागील मास्टर प्लॅन सांगितला. 'जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर जग तुमचे ऐकेल', असंही गडकरींनी सांगितले.
"जर भारत प्रत्येक क्षेत्रात बलवान झाला तर जग निश्चितच भारताचे ऐकेल. नागपूरमध्ये राष्ट्र निर्माण समिती आयोजित 'अखंड भारत संकल्प दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
"१९४७ मध्ये या दिवशी देशाचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग झाले होते, म्हणून आपल्याला 'अखंड भारत संकल्प दिवस' आठवतो. आपल्या देशाचे विभाजन अनैसर्गिक होते आणि एक दिवस आपला देश 'अखंड' म्हणजेच एकत्रित होईल हे आपण सर्वजण एक ध्येय म्हणून स्वीकारतो, आजच्या या कार्यक्रमात आपण हा संकल्प करतो",असंही गडकरी म्हणाले.
सशस्त्र दलांचे कौतुक केले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या विविधतेतील एकतेचे कौतुक केले आणि देशाच्या सशस्त्र दलांचेही कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, तसेच "स्वावलंबन" आणि "विश्वगुरू" बनवण्याचा संकल्प केला आहे, असंही ते म्हणाले. हे सर्व संकल्प प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नांनी पूर्ण होतील, असंही गडकरींनी सांगितले.