आभाळात नाही, पाणी फक्त डाेळ्यांत... ऑगस्ट महिन्यात केवळ ३१ टक्के पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 10:09 IST2023-08-26T10:07:46+5:302023-08-26T10:09:32+5:30
ये रे ये रे पावसा, तू वाढवताेय चिंता; मायबाप सरकार मदत करणार का?

आभाळात नाही, पाणी फक्त डाेळ्यांत... ऑगस्ट महिन्यात केवळ ३१ टक्के पाऊस
मनाेज माेघे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुलैपर्यंत सुरळीत असलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये चांगलीच ओढ दिली आहे. या महिन्यात सरासरीच्या केवळ ३१ टक्केच पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यातील २९७ महसुली मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट राज्यावर घोंघावू लागले आहे. शेतकऱ्यांची पिके करपू लागली असून, वरुणराजाची कृपा न झाल्यास पिकांचे नुकसान आणि कर्ज परतफेड अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
कृषी विभागाने १ जून २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीबाबतचा पीक पाहणी अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पिके फुलोऱ्याला आली, पण पावसाचा पत्ताच नाही
सोयाबीन, मका ही पिके आता फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याने पावसाची मोठी गरज निर्माण झाली आहे. राज्यात आज जरी पाऊस आला तरी सोयाबीन व मक्याच्या उत्पादनात किमान ३० टक्के घट होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन आठवडे पाऊस न आल्यास उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची भीती कृषितज्ज्ञांनी
व्यक्त केली आहे.
२५ ते ५०% पाऊस पडलेले तालुके
- नाशिक - सिन्नर, चांदवड, नांदगाव, नाशिक, इगतपुरी
- नंदुरबार - नंदुरबार
- अहमदनगर - संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी
- पुणे - बारामती, पुरंदर (सासवड), हवेली (पुणे)
- सातारा - कोरेगाव, फलटण
- सांगली - कडेगाव, खानापूर (विटा)
- कोल्हापूर - राधानगरी
- बुलढाणा - बुलढाणा
- अकोला - अकोट
- अमरावती - दर्यापूर