शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मनासारखे मानसशास्त्रज्ञ न लाभल्याने कामगिरीवर परिणाम : ऑलिम्पियन राही सरनोबतची खंत  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 1:53 PM

मानसशास्त्रज्ञांची देशात कमतरता नाही. परंतु, हवे तसे मानसशास्त्रज्ञ आपल्या नेमबाजांना मिळत नाही..

ठळक मुद्दे नेमबाजी हा पूर्णत: मानसिकतेचा खेळ 

पुणे : नेमबाजी हा पूर्णत: मानसिकतेचा खेळ आहे, हे ऑलिम्पिकमधील अनुभवातून मला चांगले लक्षात आले. या खेळात यश मिळविण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रज्ञांची देशात कमतरता नाही. परंतु, हवे तसे मानसशास्त्रज्ञ आपल्या नेमबाजांना मिळत नाही, यामुळे कामगिरीवर परिणाम होतो, अशी खंत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने शुक्रवारी व्यक्त केली. आयएसएसएफ विश्वचषकातील २ सुवर्णपदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अनेक पदके जिंकून दिलेल्या राहीचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ऑलिम्पिक तयारीविषयी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी राही म्हणाली, ‘‘नेमबाजीमध्ये प्रत्यक्ष नेम साधताना खेळाडूची मानसिकता कशी आहे, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. खेळाडूंची मानसिकता कायम उच्च दर्जाची राहावीख यासाठी चांगला मानसशास्त्रज्ञ त्याच्यासोबत असणे अनिवार्य आहे. नेमबाजाला खेळाच्या प्रशिक्षणासोबतच मानसिकतेचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.’’२०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी २०१७ पासून सुरू केली आहे. यासाठी जर्मन प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेत आहे. कारकिर्दीतील हे दुसरे ऑलिम्पिक असल्याने अनुभवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ऑलिम्पिकचा दबाव पेलण्याचे प्रमुख आव्हान खेळाडूंसमोर असते, असेही राहीने नमूद केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते........‘राष्ट्रकुल’मधून नेमबाजी वगळल्याचा फटका भारताला बसणार राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळण्यात आला आहे. आजवरचा स्पर्धा इतिहास बघता भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीतून मिळतात. त्यामुळे यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याच्या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. यामुळे भारताची पदकसंख्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. ‘राष्ट्रकुल’मधील इतर देशांनी त्यांचे हित पाहून हा निर्णय घेतला आहे. भारताच्या दृष्टीने मात्र हा निर्णय नुकसानकारक आहे, असेही राहीने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRahi Sarnobatराही सरनोबत