Sanjay Raut: मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:32 IST2022-04-17T20:32:45+5:302022-04-17T20:32:51+5:30
भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत.

Sanjay Raut: मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत
देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत एक मोठी बैठक होणार आहे. मुंबईमध्ये गैर-भाजपा मुख्यमंत्र्यांना एकत्र आणले जाणार आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याचे संकेत दिले असून तशा हालचाली सुरु झाल्याचे ते म्हणाले.
भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत. यातूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. यामुळे ज्या राज्यांत भाजपा सत्तेत नाही अशा राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
यासंबंधात राऊत म्हणाले की, ममता यांनी या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर चर्चा केली आहे. यानंतर मुंबईत अशाप्रकारचे संमेलन आयोजित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. या बैठकीमध्ये बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, सामाजिक हिंसा निर्माण करण्याचे प्रयत्न आदींवर चर्चा केली जाणार आहे.
आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं. पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.